पावसाळ्याचे दिवस असल्याने होणाऱ्या चिखलामूळे साठलेल्या पाण्यामुळे परिसरात रोग पसरू शकतात.याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने व आरोग्य केंद्राने काहीही उपाययोजना केलेली दिसत नाही.त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे.
ज्याप्रमाणे प्रशासनाने तत्परता दाखवत आज बाजार मैदानात मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे त्याचप्रमाणे स्वच्छते संदर्भात देखील जनजागृती करून योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.याबाबत प्रशासन उदासीन असल्याने मागील आठवड्यात बाजार तळावर निम्या जागेत बाजार भरला गेला होता
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल घेऊन माघारी फिरावे लागले होते.ग्रामस्थ देखील आपण या गावचेच नाही अशी भूमिका घेत असुविधेबाबत मौन व्रत का धारण करत आहेत हा एक कुतूहलाचा व वैचारिक प्रश्न सध्या पडलेला असून ग्रामस्थांनी देखील स्वच्छतेचा वसा घेऊन आपला व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न सोडवायला हवा व वेळोवेळी प्रशासनास या बाबी निदर्शनास आणून द्याव्यात.मिळालेल्या माहिती नुसार रातोरात मुरूम टाकण्यात येणार असून आता सदरील जागेवरून राडारोढा झाकण्यासाठी किती गाड्या मुरुमाच्या खाली केल्या जातील यावर ग्रामस्थांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केलेली आहे,



