March 30, 2026

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 

     कान्हूर मेसाई (ता शिरूर) येथे अतिवृष्टीमुळे तलावफुटी होऊन पाणी गावठाणात घुसल्याने अनेक परीवारांची हानी झाल्याने शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसने दिवाळीच्या तोंडावर मदतीचा हात देत काही कुटुंबांना किराणा सामानाचेकीटस् व पाच कुटुंबांना २१ हजार, अकरा हजार अशी आर्थिक मदत दिली .

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे , राष्ट्रवादीचे शिरूर आंबेगावचे विभागाचे जिल्हाध्यक्ष मानसींग पाचुंदकर, माजी सभापती प्रकाश पवार, विश्वास आबा कोहकडे , राष्ट्रवादीचे सरचिटणीस ज्यांनी याआधीही मदत केली ते बबनदादा शिंदे , सरपंच चंद्रभागा खर्डे , माजी सरपंच दादा खर्डे , बंडू पुंडे , बापुसाहेब ननवरे , उपसरपंच सोपान पुंडे , दिपक पुंडे ,

विद्याधामचे सचिव सुदाम तळोले , ज्यांनी समाजास मदतीचे आवाहन करून मदत मिळणेस हातभार लावला ते शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शहाजी दळवी, सोसायटीचे सुखदेव खर्डे , ओबीसीचे तालुकाध्यक्ष अल्ताब तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य मोहन पुंडे ,

युवानेते निलेश ननवरे, विठ्ठल खर्डे , पिराजी माकर आदी उपस्थीत होते . पारंपारीक अशा दुष्काळी कान्हूर मेसाई विभागाला प्रतिवर्षी पाण्याचे टँकरसाठी नेत्यांकडे पाठपुरावा करावा लागतो , पण यंदा निसर्गाच्या कोपाने उलटप्रकारे मदत करावी लागत असलेचे माजी आमदार गावडे यांनी सांगीतले . सुत्रसंचलन माजी उपसरपंच दिपक तळोले यांनी व आभार माजी सरपंच बंडू पुंडे यांनी मानले .