March 30, 2026
ऑनलाइन घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा वितरण बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष  रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते पार पाडला
सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक 
     सासवड (तालुका पुरंदर) येथे  ऑनलाइन घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा वितरण बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते पार पाडला.   

 गौरी गणपतीचे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक .माधुरी मोरे स्वातंत्र्यलढा, द्वितीय क्रमांक-कुमार गोंदकर आई काय काय करते, तृतीय क्रमांक स्मिता मांढरे हर घर तिरंगा. सन्माननीय उपस्थिती संभाजीराव झेंडे साहेब तसेच पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर  दुर्गाडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या   विजय  कोलते, पुष्कराज  जाधव यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सासवड शहर यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले नगरसेविका मंगलनानी म्हेत्रे,राष्ट्रवादी  युवक अध्यक्ष सासवड शहर अतुल जगताप, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष नीताताई सुभागडे, तसेच  प्रवक्ते सासवड शहर संतोष काका जगताप सासवडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राजू टकले,मणिश रणपिसे, सयाजी वांढेकर,सेवा दलाचे अध्यक्ष मनोहर तात्या जगताप, युवती अध्यक्ष तृप्ती शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे उपाध्यक्ष तेजस कराडे, महेश बाळा जगताप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष विनय जमदाडे ,अभी निकुडे, आदि उपस्थित होते,