शंतनू पिंगळे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेंट व्हीसेंट स्कूल पुणे, उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे, तर बी. टेक. (आयटी) ही पदवी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे या महाविद्यालयातून पूर्ण केले. श्री अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ भांबर्डे या संस्थेचे अध्यक्ष आणि राज्यशासनाच्या सहकार खात्यातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी चांगदेव पिंगळे यांचे ते चिरंजीव आहेत. एकंदरीत प्रशासकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक काम करणाऱ्या पिंगळे कुटुंबाच्या उत्तुंग भरारीतून शंतनु पिंगळे यांना अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याची माहिती सत्कार प्रसंगी शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव आणि न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे शाळेचे मुख्याध्यापक मारुती कदम यांनी दिली. यावेळी अंबिका शिक्षण संस्थेचे सचिव बापूराव पवार, संचालक रामभाऊ पवार, दशरथ पवार, हनुमंत पवार, शिवाजी वीर आणि ग्रामस्थांनी पिंगळे यांचे अभिनंदन केले.

