कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) तसेच पेरणे (तालुका हवेली) येथे टोरेंट सीएनजी कंपनीच्या चाललेल्या ड्रिल द्वारे खोदकामस पेरणे ग्रामपंचायतने विरोध केला असून, ऐतिहासिक ब्रिटिशकालीन असणाऱ्या वास्तू विजयस्तंभ, पूल, त्याचप्रमाणे घरांना त्यापासून धोका होणार नाही असे हमीपत्र ग्रामपंचायत पेरणे यांनी लेखी पत्राद्वारे मागवली आहे, हे हमीपत्र जमा करेपर्यंत काम थांबवावे अशी मागणी केली आहे,
कोरेगाव भीमा आणि पेरणे या दोन गावांना जोडणारा ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पूला जवळ टोरेंट कंपनीच्या वतीने पूर्व बाजूने पुलाच्या जवळून नदीच्या भूभागातून आर पार विजय स्तंभाकडे ड्रिल मारण्याचे काम चालू आहे, या ड्रिल खोदकामामुळे ऐतिहासिक ब्रिटिश कालीन विजयस्तंभ, पूल, तसेच जयस्तंभाचे इन्चार्ज माळवदकर (जमादार) तसेच परिसरातील घरांना धोका होऊ शकतो,
