या प्रसंगी संयोजक शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, महिला शहर अध्यक्षा आशा गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय बाप्पू पठारे, युवासेना तालुका प्रमुख विशाल पोतले, युवा सेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे, सहकार सेना उप तालुका प्रमुख शंकर आण्णा घेनंद, शिवसेना महिला आघाडी उप तालुका प्रमुख स्वप्नजा फुले, युवती सेना उप तालुका प्रमुख मनिषा थोरवे, चऱ्होली खुर्द शिवसेना शाखा प्रमुख संदीप पगडे, शेतकरी संघटना उप विभाग प्रमुख डॉ. विकास थोरवे, वाहतूक सेना उप विभाग प्रमुख परशुराम ठाणगे, अनिल जोगदंड, महादेव पाखरे, शिवसेना युवती उपतालुका प्रमुख खेड मनीषा थोरवे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख खेड स्वप्नजा फुले, सरस्वती खोडसे, सोनाली मोहिते, पूजा मिसाळ, मनीषा थोरवे, ललिता हळदे, उषा नेटके, अश्विनी ननवरे, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था संचालक सचिन शिंदे, ज्ञानेश्वर गारकर, किशोर देशपांडे, नितीन ननवरे, रोहिदास कदम, दिनकर तांबे, ज्ञानेश्वर घुंडरे, शुभम कड यांचेसह महिला, पुरुष वारकरी, साधक आदी उपस्थित होते.
जयंती दिंडी मिरवणूक भैरवनाथचौक येथून श्री छत्रपती पुतळा येथे शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास अभिवादन करीत पुष्पहार अर्पण करून महाद्वारात सांगता झाली. महाद्वारात महिला वारकरी साधकांनी हरिनाम गजर करीत लाठी काठीचे प्रात्याक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी अभिवादन सभा झाली. यावेळी सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करीत माँ जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत भारत घडविण्याचे कार्य हिंगे महाराज यांचे माध्यमातून सुरु आहे. महिला साधकांसह श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या साधक मुलांचे कौतुक करण्यात आले. श्री आळंदी धाम सेवा समिती, आळंदी शहर शिवसेना पदाधिकारी यांनी उपक्रमाचे संयोजन केले. यावेळी पोलीस कर्मचारी, पोलीस मित्र, दिघी आळंदी वाहतूक पोलीस, आळंदी पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी पायी दिंडी मिरवणूक मार्गावर सुरळीत वाहतुकीचे नियोजन केले.
