रांजणगाव गणपती प्रतिनिधी
रांजणगाव येथील राजमुद्रा चौकापासून ते महागणपती मंदिरांपर्यत मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांना औक्षण करण्यासाठी अलोट गर्दी जमली होती. रांजणगाव सह परिसरातील व औद्योगिक वसाहतीमधील लाखो भाविक यावेळी रस्त्याच्या दुतर्फा त्यांच्या स्वागताला ऊभे होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मनोज जरांगे यांना दोनशे किलोचा हार घालून व जेसीबी व पोकलेनमधून फुलांची उधळण करुन स्वागत करण्यात आले. या नंतर जरांगे पाटील यांनी महागणपती मंदिरात दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले.
यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा . स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष . संदिप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी, युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे , मनसेचे तालुकाप्रमुख नानासाहेब लांडे , उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील , राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्ताञय पाचुंदकर पाटील, महेश फंड ग्रामपंचायत सदस्य अनिल दुंडे निलेश लांडे , विलास बत्ते , आकाश बत्ते , किशोर टावरे , कुमार नाणेकर , सचिन दुंडे , सोमनाथ बांदल , रोहन लांडे तुषार शेळके यांसह ग्रामस्थ महिला भगिनी , देवस्थान कर्मचारी कामगार वर्ग रांजणगाव पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
