प्रतिनिधी गौतम पिसे
जागतिक महिला दिना निमित्त हडपसर विधानसभा मतदार संघात मिलिंद बुद्ध विहार रामटेकडी येथे सफाई कर्मचारी महिला भगिनीचा शाल पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन सन्मान करण्यात आला शहर अध्यक्ष दिपकभाऊ मानकर, कार्याध्यक्ष प्रदीपदादा देशमुख यांच्या सूचनेनुसार सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांच्या मार्गदर्शना खाली शहर निरीक्षक डॉ गौतम पिसे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,
शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झालेली असताना ओला सुका कचरा वेगळा करून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम प्रामाणिक पणे नित्य नियमाने करणाऱ्या सफाई कामगार महिलांचा सन्मान सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांच्याशुभ हस्ते करण्यात आला सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष विनायक जाधव नितीन कडू समन्वयक पूनम सोनावणे स्वरित इसवे काँग्रेसचे युवा नेते संतोष सुपेकर प्रभाग क्रमांक 24 माजी नगरसेवक अरुण आल्हाट डॉ किशोर शहाणे प्रा सचिन मंडले मनोहर काका कांबळे मिलिंद बुद्ध विहाराचे व्यवस्थापक बळीराम धाडवे पत्रकार दीपक शिंदे बबलू रणे जितेंद्र शिंदे संजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते,
सदर कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा अध्यक्ष माननीय वामन बळीराम धाडवे कार्याध्यक्ष नामदेव उपाडे यांनी केले होते, सदर कार्यक्रमाला सर्व महिला भगिनी सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर उपस्थित होते, शहर अध्यक्ष जयदेव इसवे निरीक्षक डॉ गौतम पिसे यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन वामन धाडवे तर आभार प्रदर्शन नामदेव उपाडे यांनी केले.
सफाई कामगार महिला प्रामुख्याने वस्ती विभागातून येतात घरातील अडचणींना तोंड देत समस्यांना सामोरे जात पती,मुलं यांना सांभाळून बाहेर कामासाठी यावं लागतं त्या माऊलीचे अतोनात कष्ट व नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या वृत्तीला त्यागाला सलाम असे गौरवोद्गार शहर अध्यक्ष जयदेव इसवे यांनी काढले, तसेच सफाई कामगार महिलांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे जयदेव इसवे यांनी सांगितले
