ग्रामपंचायत प्रशासन हे गावातील रहिवासी नागरिकांचे वीज बत्ती कर ग्रामस्थांकडून आकारत असते त्यामुळे गावामध्ये गावठाण व वाड्या,वस्त्यांवर वीजेच्या उद्भवणाऱ्या समस्यांकडे खरे तर वीज वितरण खात्यासह,गावचे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,पदाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.परंतु या वढू खुर्द गावातील उदभवलेल्या वीज समस्येकडे पाहता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले पहावयास मिळत आहे.
त्याचप्रमाणे वढू खुर्द गावामध्ये बंद पडलेले वीजेच्या दिव्यांचे खांब तसेच पडून आहे.तर वीज वाहिनी खांबावर प्रमाणापेक्षा वीज कनेक्शन च्या तारांचे जाळे पसरले आहे.तसेच अजूनही वीज वाहिनी तारांसाठी जे खांब उभारलेले आहेत त्यातील काही खांब हे लोखंडी खांब असून खाली त्याच्या भोवती कोणतीही सुरक्षा नाही.त्यामुळे येथेही धोकादायक स्थिती निर्माण झालेली पहावयास मिळते. या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, एखाद्या मोठ्या अपघाताची ग्रामपंचायत वाट पाहत आहे काय? किंवा एखाद्याचा जीव गेल्यावर ग्रामपंचायत व महावितरण कंपनी दुरुस्ती करणार काय अशी परिस्थिती वडू खुर्द गावामध्ये तयार झाली आहे,
गावामध्ये लोंबकळणाऱ्या वीज वाहिनी तारंबद्दल मागे अनेक वेळा वीज खात्याकडे पत्रव्यवहार केला आहे.तसेच इतर काही ग्रामपंचायत स्तरावर काही वीजेच्या समस्या,प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी प्रयत्न करू.
ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थांकडून दिवा,बत्ती असा वीज कर आकारत असते ग्रामपंचायत स्तरावर जर काही गावामध्ये वीजेच्या समस्या,प्रश्न उदभवत असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू व वीज वितरणकडे पत्राद्वारे पाठपुरावा करू.
