गंधर्व हॉटेल कोरेगाव भीमा येथे झालेल्या सभेमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाबा गोलंदाज यांच्या हस्ते प्रकाश आगळे यांची जालना जिल्हा अध्यक्षपदी व पांडुरंग ढेरंगे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी व योगेश देवरे जळगाव जिल्हा युवक अध्यक्षपदी व पांडुरंग जाधव यांची जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती यावेळी करण्यात आली यासंदर्भातील निवडीचेपत्र व आयडी कार्ड देऊन सत्कार करण्यात आले,
या वेळी सुरक्षा परिषदेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या नियमांचे पालन करून पुणे जिल्ह्यामध्ये तळागाळापर्यंत लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असताना पुणे जिल्ह्यामध्ये सुरक्षा परिषदेचे व्याप्ती वाढवणार असल्याचे यावेळी पांडुरंग ढेरंगे यांनी सांगितले,
