March 30, 2026
सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडण्याचे मागणीस जलसमाधी आंदोलन

सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडण्याचे मागणीस जलसमाधी आंदोलन

आळंदी प्रतिनिधी

औंढा नागनाथ येथील केळी पाझर तलावात सिद्धेश्वर धरणाचे पाणी सोडण्याचे मागणीसाठी सोमवारी ( दि. ११ ) सकाळी ११ वाजता गोळेगाव कालव्याचा वाहत्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांनी लक्षवेधी जल समाधी आंदोलन केले. यावेळी हिंगोली पाटबंधारे विभागाचे अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावा सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसा पासून शासनाकडे मागणी करून पाठपुरावा केला. मात्र या प्रचंड विलंब झाल्याने आंदोलन हाती घ्यावे लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वेळोवेळी निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती.

मात्र राज्य शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. २७ गावच्या शेतकऱ्यांना सिंचना साठी पाणी उपलब्ध नसल्या मुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत. २७ गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाने आता पर्यंत कोणतीही ठोस उपाय योजना केलेली नाही.

या मुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कालव्यात बसून जलसमाधी आंदोलन करावे लागले. हिंगोली पाटबंधारे विभागाचे अभियंता पत्की सर यांनी शेतकऱ्याच्या सर्व मागणी मान्य करून लेखी आश्वासन दिले. या आंदोलनाला कोणतेही प्रकारचे गालबोट लागणार नाही व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

अग्निशामक दलाच्या गाड्या देखील आंदोलन स्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. या आंदोलनात एकनाथ नागरे, गंगाधर घुगे बालाजी सांगळे. संतोष मोरगे, अमोल सांगळे, भास्कर आघाव, प्रल्हाद गिते, गजानन कुटे, निवास पाटील, निवास घुगे सोपान आघाव, शुभम सांगळे यांच्या सह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Loading