March 30, 2026
कोरेगाव भीमा येथील फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात

कोरेगाव भीमा येथील फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन साजरा

सुनील भंडारे पाटील

कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील फ्रेंड्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी महाराष्ट्र व कामगार दिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,

संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश खैरमोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,उपस्थितांमध्ये संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे सचिव दिलीप भोसले, संचालक शंकर गव्हाणे, रामदास सव्वाशे, राजेंद्र गव्हाणे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सैदाने, उपमुख्याध्यापिका अजिता नायर, सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

संस्थेचे सचिव दिलीप भोसले यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनाची स्थापना कशी झाली याची माहिती दिली.सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षिका वैशाली धर्माधिकारी यांनी केले, यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते,

Loading