शेतातील महावितरणाच्या विद्यूत रोहीत्रां मधील तांब्याच्या तारा चोरी करणारे जेरबंद १६ गुन्हे उघड
शेतातील महावितरणाच्या विद्यूत रोहीत्रां मधील तांब्याच्या तारा चोरी करणारे जेरबंद १६ गुन्हे उघड
सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी उल्लेखनीय कामगिरी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतातील विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयामध्ये मागील ३ महीन्यांमध्ये वाढ झाली होती ,
विद्युत रोहीत्र चोरी नंतर शेतकऱ्यांची पाण्याविना पिके जळून जाऊन शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत होते, विद्युत रोहीत्र चोरी करणार्या चोरांचा शोध घेवुन चोरीला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलीसांपूढे होते.
दिपरतन गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी विद्यूत रोहीत्रामधील तांब्याच्या’ तारा चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेणे बाबत ‘ गन्हे शोध पथकाला सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विद्युत रोहीत्र चोरींच्या गुन्हयांचा सखोल तपास करून ‘ तांत्रिक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही. फूटेजव्दारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींची माहीती काढली.
सदर आरोपींची माहीती घेवून आरोपी १)नजीबउल्ला घम्मल सहा, वय ३२ र्षे, रा.बोटा, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर, मुळ रा.बिजोरा ‘ पोस्ट रमवापुर जगतराम, जि. सिद्धार्थ नगर उत्तरप्रदेश, २) अमितकुमार मुन्ना सरोज, वय २० वर्षे, रा.वेळ, ता.भोर, जि.पुणे. मुळ रा.मगरदहा, पोस्ट बेडार, ‘ता.भोरावल, जि.सोनभद्र, उत्तरप्रदेश, ३)रवी ब्रिजलाल अग्रवाल, वय ३४ वर्षे, रा.बोटार, ता.संगमनेर, जि. अहिल्यानगर. मुळ रा.भवरीया, ता.बासी, जि.सिध्दार्थनगर , उत्तरप्रदेश, ४) सुभाषचंद्र ब्रिजलाल अग्रवाल , वय २२ वर्षे, रा.संगमनेर, जि.अहिल्यानगर. मुळ रा.भवरीया, ता.बासी, जि.सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश, ५्)लालुकुमार कामेश्वर चौधरी. वय २२ वर्षे. रा.बोटा, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर, मुळ रा.हरभंगी, पोस्ट झांजाडपुर, जि. मधुबनी, राज्य बिहार, ६)शिवपुजन रामकमार अग्रारी, वय २७ वर्षे, रा.बोटा, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर. मुळ रा.महतनिया, ता.भवानीगंज, जि.सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले.
नमुद आरोपींनी शिक्रापूर पोलीस स्टेशन, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व शिरूर पोलीस स्टेशन या ३ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळया ठिकाणच्या विद्युत रोहीत्रांमधील ‘ तांब्याच्या तारा चोरी करून ” त्यापैकी’ काही तारा कुदळवाडी चिखली, पणे येथे विकल्याची कबुली दिली.
त्याप्रमाणे चोरीचा मुद्देमाल स्विकारणारा आरोपी क्रमांक एकास कलामददीन कमरूदृदीन ठाकर, वय ४१ वर्ष, रा.कदळवाडी, विठठल मंदीराचे जवळ, चिखली, ता.हवेली जि.पणे यास ताब्यात घेतले असता त्याने देखील विद्यूत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा विकत घेतल्याचे कबुल केले.
आरोपीना गुन्हा नोंद कमांक २१६/ २०२६ भारतीय विद्युत कायदा कलम १३६ सह भारतीय न्याय संहीता कलम ३१७(२), ३(५) या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली असुन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने अटक आरोपी कमांक १ ते ७ यांना दिनांक ०२/ ०५। २०२६ रोजी पर्यंत पोलीस् कस्टडी रिमांड मंजुर केली आहे,
गुन्हयाचे तपासामध्ये आरोपींकडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेली १ पोलो कार, १ क्विड कार, गुन्हा करण्यासाठी वापरलेले साहीत्य ‘ साधने यासह गुन्हयातील चोरलेले एकुण ४१० किलो विद्युत रोहित्र मधील तारा असा एकण १२.९२.000 /- रूपयांचा (बारा लाख बेण्णव हजार रूपये किंमतीचा) मद्देमाल जप्त करण्यात आला आहे, आरोपीनी तपासामध्ये एकुण १६ गन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
सदरची कामगिरी संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पूणे ग्रामीण,रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पूणे, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली दिपरतन गायकवाड पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली महेश डोंगरे पोलीस उपनिरीक्षक यांचे सह श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार शिवाजी चितारे, अमोल चव्हाण, श्रीमंत होनमाने ,अमोल दांडगे. रोहीदास पारखे, विकास पाटील, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिद्र निचीत यांचे पथकाने केली आहे,
![]()
1
