March 30, 2026
लोणीकंद पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी मॅफेड्रॉन विक्री करणारे ६ आरोपी जेरबंद
लोणीकंद पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी मॅफेड्रॉन ड्रग्ज एम.डी पावडर विक्री करणार्या एकुण ०६ आरोपीना केले अटक
सुनील भंडारे पाटील
पोलीस आयक्त पुणे शहर अंमली पदार्थाची विक्री करणा-यांवर सर्जिकल स्ट्रईक करुन समुळ उच्चाटन करणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपआयूक्त सोमय मंडे परिमंडळ ७. पणे शहर यांनी अंमली पदार्थाची विक्री करणारे यांची गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करुन कायदेशिर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या,
लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे आदेशाबाबत व पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७, पुणे शहर यांचे सुचनांची माहिती देऊन अंमली पदार्थाची विक्री करणारे इसम ताब्यात घेवुन कारवाई करणेबाबत कळविले.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोहवा कैलास साळुंखे व स्वप्नील जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कटकेवाडी फाटा, लोणीकंद, पुणे या ठिकाणाहुन इसम नामे पुंजाजी जयचंद्र चौधरी , वय ४० वर्ष, रा. जय मल्हार सोसायटी , फुलमळा रोड, वाघोली, पुणे मुळपत्ता – मु.पो. निपाणा , ता. मोताळा, जि. बुलढाणा यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे ४.३७.२००/- रुपये किंमतीचे एकुण २१.८६० ग्रॅंम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी) व ५०,०००/-” रुपये किंमतीचा त्याचा वापरता आयफोन मोबाईल असा एकुण ४.८७,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडल्याने तो जप्त करुन त्याचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्यास अटक करुन पोलीस कस्टडी घेण्यात आली,
त्याचप्रमाणे पेरणे फाटा, पुणे येथे इसम नामे 1) राजंद्र केरु टेळे, वय ३५ वर्ष, रा. अथर्वनगर, चाकण रोड, शिक्रापुर, पुणे २) करन सचिन मोहिते, वय २१ वर्ष, रा. सणसवाडी, पुणे यांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यात एकुण ११,८३,000- रुपये किंमतीचे एकुण ५९.१६० ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी), एक कार, मोबाईल फोनव रोख रक्कम असा एकुण १४,१०,९७०|- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन या सर्व इसमांविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्ह दाखल करुन त्यांना अटक करुन पोलीस कस्टडी घेण्यात’ आलीआहे ,
तद्नंतर नमुद आरोपीकडे अधिक तपास करुन अटक इसम नामे १) भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित, वय २८ वर्षें, रा. मांजरी, पणे मुळपत्ता – राजस्थान २) आदिनाथ दशरथ शिर्के, वय २९ वर्षें रा. मांजरी, पूणे यांना मगर वस्ती, लोणीकंद, पुणे येथुन ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यात एकुण ४.२८ .६००/- रुपये किंमतीचे एकुण २१.४३० ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी) व ४,00 ,000/- रुपये किंमतीची कार तसेच त्यांचे वापरते मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकुण ८.३४.०२०/ रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त करुन नम्द आरोपींना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली तद्नंतर वरील तिन्ही अटक आरोपींकडे एकत्रित तपास करुन
इसम नामे योगेश लक्ष्मण चव्हाण , वय ३ वर्षे, रा. आझाद गल्ली, शहाजी चौक, शिरवळ, ता. खडाळा , जि. सातारा यास ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एकुण १४,५०,००० |- रुपये किंमतीचे एकुण ७२.५०० ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी) जप्त करुन त्यास गुन्हयात अटक करुन पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे.
वर नमद केलेल्या कारवाई दरम्यान एकण ०६ आरोपी अटक करुन त्यांचे ताब्यातून एकण ३४,९८ ,८००/- रुपये किंमतीचे एकण १७४.९५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर (एम.डी) जप्त करण्यात आलेली आहे .
आरोपी सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडीत येरवडा जेल येथे असून सुनिता रोकडे, वरिष्ठ पेलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शना खाली गुन्हयांचा तपास चालु असून अटक आरोपींचे इतर साथीदारांचा शोध चालू आहे
सदरची कामगिरी सोमय मूंडे साो, पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ ७, पुणे शहर,  नुतन पवार सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, पूणे शहर, यांचे मार्गदर्शन खाली सुनिता रोकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर., तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदग्डे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, कैलास साळुंके जगताप, गणेश गायकवाड, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड शंकर क्षिरसागर, संदीप पाचंगे यांनी केली आहे,

Loading