क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवराचा सन्मान..!
शिक्रापूर प्रतिनिधी संदिप ढाकुलकर
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून शिक्रापूर येथे तथागत मैत्री संघ बहुउद्देशीय संस्था व कर्तव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी हा सोहळा पार पडला,
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ही जयंती तालुक्यातील आदर्श व प्रेरणादायी अशी वैचारिक व विविध कलागुणांना वाव देत सामाजिक बांधिलकी जपणारी भीम जयंती ठरली.याप्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपरतन गायकवाड साहेब यांनी महापुरुषांच्या विचारांना मानणारे व त्यांचे अनुकरण करणारा समाज घडायला हवा अशा भावना व्यक्त केल्या,
या सोहळ्यामध्ये प्रा.अनिल नरके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी आर.एम.मेश्राम यांच्या ‘गुरु’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कर्तव्य फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय,शैक्षणिक,सामाजिक,पत्रकारिता,कृषी यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला,
प्रामुख्याने डॉ.जाधव,डॉ.दातखिळे,डॉ.हिवरकर,डॉ.गायकवाड,डॉ.काशीद,डॉ.पवन सोनवणे,डॉ.अजिंक्य तापकीर,डॉ.खडे मॅडम,मा.विस्तार अधिकारी डि.के.गायकवाड साहेब, कृषी अधिकारी.अशोक जाधव,मेजर तुकाराम डफळ राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल/पत्रकार संतोष काळे,पत्रकार उदयकांत ब्राह्मणे,निलेश जगताप,राजाराम गायकवाड आणि विशेष महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुण सहकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या जयंतीच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्या मोनिकाताई हरगुडे कर्तव्य फाउंडेशनचे संस्थापक तथा सरपंच रमेशजी गडदे तथागत मैत्री संघाचे अध्यक्ष मेश्राम सर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ अधिकारी दीपरतन गायकवाड साहेब निवृत्त पोलीस अधिकारी विलास सोंडे साहेब कर्तव्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.मनीषाताई गडदे तालुक्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नरके समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भुजबळ पंचायत समितीचे मा.विस्तार अधिकारी डि.के.गायकवाड साहेब शिक्रापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मयूर करंजे, सुभाष खैरे सौ.मोहिनी ताई युवराज मांढरे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश भुजबळ साकोरे सर, बोरकुडे सर ,सुजाता खैरे ,अर्चना सासवडे,वंदना रामगुडे रवी झोडपे, महेश शिर्के, मोहम्मद भाई तांबोळी, जितेंद्र काळोखे, हार्दिक गडदे यासह तथागत मैत्री संघाचे व कर्तव्य फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
![]()
