March 30, 2026
शिक्रापूर येथे क्रांतिसूर्य जयंती मोठ्या जल्लोषात साजरी बालगोपालने घेतले लक्ष वेधून

शिक्रापूर येथे क्रांतिसूर्य जयंती मोठ्या जल्लोषात साजरी बालगोपालने घेतले लक्ष वेधून.!

शिक्रापूर प्रतिनिधी 

शिक्रापूर (पुणे)येथे कांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी बालगोपालाचा आनंद पाहण्यासारखा होता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेषात आदित्य सचिन गायकवाड आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेषात अर्णवि अक्षय गायकवाड या छोट्या जोडीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते,

या वर्षी जयंतीच्या निमित्ताने महात्मा जोतिबा फुले चौकातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या वेळेस महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भुजबळ , शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे,मा.उपसरपंच त्रिनयन कळमकर,उद्योजक सागर सायकर,गाडा मालक तसेच चेयरमन निलेश थोरात,सोमा तात्या सायकर, किरण गायकवाड,सचिन गायकवाड, मा उपसरपंच सुभाष मामा खैरे ,सुजाता खैरे,मा.उपसरपंच पूजा भुजबळ ,उद्योजक दिपक भुजबळ,उद्योजक अक्षय गायकवाड,पांडा गायकवाड ,पत्रकार राजाराम गायकवाड,प्रहार संघटनेचे संदिप ढाकुलकर आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Loading