March 30, 2026
शिक्रापूर येथे भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ ११ वर्षीय मुलीचा घेतला चावा

शिक्रापूर येथे भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ ११ वर्षीय मुलीचा घेतला चावा..!

शिक्रापूर प्रतिनिधी संदीप ढाकुलकर

शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे सध्या भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरु असून येथील त्रिमूर्ती कॉलनी मलठण फाटा परिसरात एका ११ वर्षीय मुलीला चावा घेण्याची घटना घडली आहे,

सदर मुलगी ही आपल्या छोट्या भावाला शाळेत घेऊन जात असताना कुत्र्याने अचानक हल्ला करत जोरदार चावा घेतल्याचे वृत्त आहे सदरील घटना परिसरातील नागरिकांना कळताच पिंटू पडवळ आणि इतर नागरिकांनी तिला त्वरित रुग्णालयात दाखल केले,

या घटनेनंतर भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे या अचानक होत असलेल्या घटना मुळे नागरिकांमधे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे,

Loading