March 30, 2026
महाळुंगे पडवळ येथे महिलांचे ज्यूट बॅग मेकिंग कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वी संपन्न

बातमी महाळुंगे पडवळ येथे महिलांचे ज्यूट बॅग मेकिंग कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वी संपन्न झाले,

आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे

Entrepreneurship Development Institute of India (EDII) यांच्या व ग्रामपंचायत कार्यालय महाळुंगे पडवळ यांचा वतीने मौजे महाळुंगे पडवळ येथे आयोजित करण्यात आलेले 50 महिलांसाठी चे ज्यूट बॅग मेकिंग कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न झाले.

या 20 दिवसांच्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर समारोप कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत महाळुंगे पडवळ सरपंच सुजाता चासकर ,पंचायत समिती सदस्य उषाताई कानडे, जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई थोरात,पंचायत समिती उमेद अभियानाचे,पारासुर सर, तसेच EDII संस्थेचे प्रशिक्षक विकास गोफणे व रजनी मिरके उपस्थित होते.

यावेळी उषाताई कानडे यांनी महिलांनी लघु उद्योग क्षेत्रात उतरून स्वावलंबी बनणे काळाची गरज असल्याचे सांगितले.जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई थोरात यांनी “महिलांनी लघु व्यवसाय करून स्वावलंबी व्हावे” असे नमूद केले पारासूर सर यांनी उमेद मार्ट द्वारे महिलांची उत्पादने विकण्यासाठी शासन स्थरावर प्रयत्न केले जात आहेत,

त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असे सांगून शासनाच्या PMEGP, CMEGP, तसेच उमेद अभियानाच्या स्वयं सहाय्यता गटांमध्ये सहभागी होऊन महिलांनी स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, असे मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना ज्यूट बॅग निर्मितीचे कौशल्य, व्यवसाय उभारणी व विपणन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. EDII संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामसंघ महाळुंगे पडवळ अध्यक्षा जयश्रीताई दहीतुले, संध्या चव्हाण प्रभाग संघ सचिव, CRP रीनाताई , अश्विनी राऊत,प्रणाली ढोले,विनया घायाळ शीतल, आवटे . तसेच प्रशिक्षीका सौ.कल्पना पवार यांनी विशेष योगदान दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक CRP रिनाताई दहिवाळ तर सुत्रसंचालन ग्रामसंघाच्या अध्यक्षा जयश्री ताई दहितुले यांनी केले आभार प्रदर्शन प्रणाली ढोले यांनी मानले,

Loading