March 30, 2026
पुणे प्रतिनिधि 
              लोणीकंद पोलीस ठाण्याच्याहद्दीतील वडगाव शिंदे परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या एका आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर,
अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Department) पथकाने छापा टाकला होता. छापा टाकून सुमारे १ कोटी ६ लाख रुपयांचे रसायन व दारू जप्त केली आहे. 

           या प्रकरणी तीन जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव शिंदे येथे अशोक सोलंकी अरुण कुवरीया, संजय कुवरीया हे गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती.वडगाव शिंदे येथील हातभट्टी वर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी 1 कोटी 5 लाख रुपये किमतीचे २ लाख १० हजार लीटर हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, एक लाख 80 हजार रुपये किमतीची १५०० लिटर हातभट्टी गावठी दारु, ते तयार करण्यासाठी लागणारे 15 हजार रुपये किमतीचेसाहित्य. असा सुमारे 1 कोटी 6 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील आरोपी नामे संजय कुवारिया याने अटक पूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालय येथे अर्ज केला होता,येथील एस. जी वेधपाठक कोर्टाने जामीन मंजूर केला. सदर आरोपी तर्फे एडवोकेट मारुती जाधव, एडवोकेट अकिब पटेल यांनी युक्तिवाद केला.