केसनंद कोरेगाव मूळ जि प गटात सुरेखाताई हरगुडे यांचा प्रचार जोमात विरोधक कोमात
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरणारा केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गट, या जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरेखाताई हरगुडे यांनी प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतली असून त्यांना जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे सुरेखाताई हरगुडे यांचा प्रचार जोमात चाललेला असून विरोधकांना याची डोकेदुखी झाली आहे,
या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरेखाताई हरगुडे उमेदवार आहेत, तसेच केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रमोद चंद्रकांत हरगुडे व कोरेगाव मूळ पंचायत समिती गणाचे उमेदवार कृषीराज दत्तात्रय चौधरी असे उमेदवार रिंगणात असून गेल्या सहा महिन्यापासून चाललेल्या निवडणुकीच्या तयारीमुळे या भागात या तीनही उमेदवारंचे पारडे जड झाले आहे,
जिल्हा परिषद गटातील पूर्व बाजूला असणाऱ्या सांगवी या गावात प्रचारा दरम्यान या गावातील लोकांनी हरगुडे यांना भरभरून प्रतिसाद दिला, तसेच निवडणुकीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे गावामध्ये बहुतांश मतदार वर्ग हा राष्ट्रवादीचा असल्याने हरगुडे यांना मोठा पाठिंबा दिल्याचे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले,
