लोणीकंद पेरणे जि प गटातून योगेश झुरुंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
भरारी न्युज वृत्तसेवा
पेरणे–लोणीकंद जिल्हा परिषद गटातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे उमेदवार म्हणून लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तसेच लोणीकंद पंचायत समिती गणातून वंदना अण्णासो शिवले तसेच पेरणे पंचायत समिती गणातून छाया ज्ञानेश्वर वाळके यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (हवेली) यशवंत माने यांच्याकडे आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख निलेश काळभोर, लोणीकंदच्या माजी सरपंच प्रियांका झुरुंगे, पेरणेचे माजी उपसरपंच चांगदेव कोळपे, ज्ञानेश्वर वाळके, अण्णासो शिवले, सागर झुरुंगे, दीपक झुरुंगे, किसन टुले, भारत झुरुंगे यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
