हरगुडे परिवार,मित्र परिवार आयोजित गंगापूजन कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद
सुनील भंडारे पाटील
केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी हरगुडे परिवार आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून आष्टापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा गंगापूजन सोहळ्यास भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला,
केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामध्ये आत्तापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त नागरिकांना काशी अयोध्या मोफत देवदर्शनाचा लाभ हरगुडे परिवार आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून देण्यात आला असून यापुढील काळात नागरिकांसाठी आरोग्य शिबिराबरोबर उज्जैन महाकालेश्वर देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले ,
भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे व केसनंद वाडे बोल्हाई गणातील उमेदवार प्रमोद हरगुडे यांनी याप्रसंगी केले आहे. हरगुडे परिवाराच्या या सर्व नियोजनाबद्दल परिसरातून कौतुक व्यक्त होत आहे,
