प्रभाग क्र.४ मध्ये तिसऱ्या आघाडीचे कडवे आव्हान,खराडी वाघोली परिवर्तन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक
सुनील भंडारे पाटील
पुणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून पुणे महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून गेल्या आठ वर्षापासून वाघोली मध्ये निवडणुका झाल्या नाहीत,
या दीर्घ कालावधीमध्ये स्थानिक आणि बहिस्थ मतदाराचा विचार करता स्थानिक मतदान स्थिर राहिले आहे बाहेरून वाघोली परिसरामध्ये रहिवासासाठी आलेल्या मतदारांची कमालीची वाढ झाली आहे,
अशा परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक चार हा खराडी भागांमध्ये जोडल्यामुळे या परिसरामध्ये सोसायटी मतदारांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे, सोसायटी मधील मतदार हा स्थानिक उमेदवारांना त्यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळा असून
त्यांना आश्वासक आणि नव्या चेहऱ्याची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये जनहितासाठी खऱ्या अर्थाने आतापर्यंत सामाजिक काम करणाऱ्या उमेदवारांकडे या मतदारांचे लक्ष असल्यामुळे स्थानिक उमेदवारांना त्यांच्या भुलथापाला कंटाळून सोसायटी मतदार नवीन उमेदवारांच्या शोधात असताना सामाजिक परिवर्तनाची हाक म्हणून नवीन तिसरी आघाडी एकत्र येऊन प्रभाग क्रमांक चार मध्ये परिवर्तन घडविण्याची दाट शक्यता आहे, नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये दगडखान कामगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बी एम रेगे संतुलन कष्टकरी महिला परिषदेच्या अध्यक्ष एडवोकेट पल्लवी रेगे सामाजिक कार्यकर्ते अनिल कुमार मिश्रा यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली ,
त्याला ऑटो रिक्षा चालक-मालक समूह संघटनेचे अध्यक्ष अश्रूबा नागटिळक बाळासाहेब चव्हाण व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनि आपला पाठिंबा दिला आहे नवीन परिवर्तन आघाडी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले असून वाघोली खराडी प्रभाग क्रमांक चार मध्ये निवडणुकीमध्ये परिवर्तन घडण्याची दाट शक्यता आहे
