लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात प्रदीपदादा कंद किंगमेकर किरण साकोरे यांचे नाव जोरदार चर्चेत
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत लक्षवेधी ठरणारी लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाची निवडणूक या गटामध्ये चौरंगी लढत होणार असून उमेदवारांची ताकद पणाला लागणार आहे, सद्यस्थितीत पैलवान किरण साकोरे यांचा राजकीय प्रभाव वाढत चाललेला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागले,
या मतदारसंघात महत्त्वाचे समजले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीप दादा कंद हे पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ तसेच पुणे जिल्हा कोर कमिटीचे महत्त्वाचे पदाधिकारी समजले जातात, प्रदीप दादा कंद यांनी स्वतःसाठी जनतेकडे कधीच काही मागितले नाही, ते आपल्या कार्यातून लोकांची सेवा करत असताना समाजाला भरभरून दिले, तसेच आपल्या सहकारी मित्रांसाठी त्यांनी आपली ताकद पणाला लावली,
कंद यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून विधानसभेला अजितदादा गटाची उमेदवारीसाठी ऑफर असताना देखील त्यांनी त्याग केला, व स्वाभिमानाने माऊली आबा कटके यांना निवडून आणले, स्वार्थी राजकारणाच्या गणितांमध्ये एवढे कोण कोणासाठी करते, याचे ज्वलंत व मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रदीप दादा कंद,
या भागात रथी महारथी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असताना प्रदीप दादा कंद यांनी स्वभावाने गरीब, मनमिळावू,अशा पैलवान किरण साकोरे यांना उमेदवारी देऊन समाजासमोर एक मैत्रीचा आदर्श उभा केला आहे,
साकोरे यांनी देखील कंद व त्यांचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनातून अयोध्या काशी आई तुळजाभवानी तुळजापूर, श्री महालक्ष्मी कोल्हापूर, श्री बाळूमामा आदमापूर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, या महत्त्वाच्या कुलदैवतांचे दर्शन तसेच दीक्षाभूमी नागपूर इत्यादी संकल्प यात्रेचे आयोजन करत जनतेचा आशीर्वाद मिळवला, जनता देखील किरण साकोरे यांना पाठिंबा दर्शवत आहे,
