March 30, 2026
सेना भी तैयार सेनापती भी तैयार …! किरण साकोरे यांची तिसरी ट्रेन पुण्याहून आयोध्या काशी

सेना भी तैयार सेनापती भी तैयार …! किरण साकोरे यांची तिसरी ट्रेन पुण्याहून आयोध्या काशी

सुनील भंडारे पाटील

लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गट पैलवान किरण साकोरे यांचा आयोध्या काशी मेळावा तिसरा टप्पा उत्साहात

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पेरणे, जिल्हा परिषद गटात किरण साकोरे यांची जोरदार तयारी चालू असून आयोध्या काशीयात्रा पहिला व दुसरा टप्पा नुकताच पार पडला आहे, त्यानंतर तिसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी पेरणे येथील गोल्डन पॅलेस मध्ये मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला,

मोठ्या उत्साहामध्ये आज पुणे हडपसर मुंढवा रेल्वे स्टेशन वरून तिसरी ट्रेन अयोध्या काशी दर्शनासाठी निघणार असल्याचे पैलवान किरण साकोरे यांनी सांगितले, लोणीकंद पेरणे या महत्त्वाच्या मतदारसंघात किरण साकोरे यांनी लोकांची मन चांगलीच जिंकली आहेत, दर्शन यात्रेतील लोकांचा आनंद व उत्साह पाहता, किरण साकोरे यांना आशीर्वाद व शुभेच्छा मिळत आहे,

नुकत्याच झालेल्या तिसऱ्या मेळावा कार्यक्रमास पुणे जिल्हा भाजपा कोर कमिटीचे सदस्य प्रदीप दादा कंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली वाळके, माजी उपसभापती संजीवनी कापरे, वढू खुर्द माजी सरपंच अनिल चोंधे, फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर, अमोल शिवले, कांताराम वागस्कर, सदाशिव झुरुंगे, भाऊ झुरंगे,लीना कंद, यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,