लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गट निवडणुकीच्या रणांगणात राजाराम दगडे पाटील यांची उडी
भरारी न्युज वृत्तसेवा
पुणे जिल्ह्यात बहुचर्चित असणाऱ्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये आता मल्हार बहुजन सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात चांगलीच कंबर कसली असून मी ही निवडणूक लढणारच असा निर्धार केला आहे,
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने सर्वतोपरी तयारी चालू केली आहे,
या निवडणुकीला दगडे पाटील यांनी चांगलीच तयारी दर्शवली आहे, त्यांचे सामाजिक काम चांगले असून ते प्रॉपर ओबीसी चे उमेदवार आहेत, तसेच या जिल्हा परिषद गटात ओबीसी पुरुष आरक्षण असल्याने, ही स्वाभिमानाची लढाई असलेली यावेळी त्यांनी सांगितले,
दगडे पाटील पुढे म्हणाले ओबीसीच्या न्याय हक्कासाठी, संविधान बचाव म्हणून, समाजातील वंचित शोषित पीडित लोकांना न्याय मिळून देण्यासाठी तसेच ओबीसी चे अस्तित्व आबाधित राखण्या साठी, मी ही निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच,
तसेच ओबीसींवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून मला पहायचे आहे, की लोणीकंद पेरणे मतदारसंघात ओबीसी जागा आहे की झोपला आहे, हे तरी मला समजेल, असे दगडे पाटील यांनी सांगितले,
