March 30, 2026
वढू बुद्रुक मध्ये हार्वेस्टर द्वारे ऊस तोडणी सुरू 

वढू बुद्रुक मध्ये हार्वेस्टर द्वारे ऊस तोडणी सुरू 

सुनील भंडारे पाटील

यंदाचा ऊस गाळप हंगाम 2025 सुरू झाला असून श्री संत तुकाराम सहकारी कारखान्याद्वारे ऊसतोड चालू झाली आहे, भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या वढू बुद्रुक तसेच आसपासच्या अनेक गावांमध्ये ऊसतोड हंगाम चालू झाला आहे,

सुधारित तंत्रज्ञान आधुनिक शेती यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भरीव अशी वाढ होत आहे, सद्यस्थितीत शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायकडे वळत आहेत,

काही वर्षांपूर्वी ऊस तोडीसाठी ऊसतोड मुजरांकडून ऊस तोडण्यासाठी मोठी आर्थिक लूट होत होती, ऊसतोड मजुरांनी प्लॉटची सुरुवात करताना ब्राह्मणासारखी नवीन पद्धत आणली होती, दक्षिणेच्या नावाखाली पैसे उकळले जायचे,

शिवाय ऊस तोडणीत कुचराई, खाली तीन कांडी, वाड्यात चार कांडी सोडून ऊस तोडल्याने तसेच पाचटामध्ये ऊस शिल्लक ठेवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते, परंतु आधुनिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे ऊस तोडणी हार्वेस्टर विकसित झाल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला आहे , ऊस तोडणी शून्य खर्चात होत आहे,

एकंदरीत सर्व विचार करता ऊस तोडणी हार्वेस्टर द्वारे केल्याने एकरी सुमारे पाच टन ऊस वजन वाढत आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाचा हार्वेस्टर द्वारे ऊस तोडण्याकडे कल वाढत आहे, शिवाय वेळेत ऊस तोडणी होत आहे, ऊस तोडणी कामगाराला एक एकर ऊस तोडण्यासाठी चार दिवस लागत आहेत, परंतु हार्वेस्टर द्वारे हे काम फक्त चार तासात होत आहे,

वढू बुद्रुक गावामध्ये उसाचे मोठे क्षेत्र असून श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याद्वारे ऊसतोड हार्वेस्टर द्वारे ऊस तोडणी चालू झाली आहे, हार्वेस्टरने ऊसतोड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे, अक्षरशा शेतकरी नंबरने ऊस तोडणी करत असल्याचे हार्वेस्टर चे मालक व शेतकरी वढू बुद्रुक विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन पोपट शिवले, योगेश शिवले, सचिन शिवले, महेश शिवले यांनी सांगितले,