March 30, 2026
ऐतिहासिक तुळापूरला प्लॉटिंग व्यवसायाचे गालबोट 

ऐतिहासिक तुळापूरला प्लॉटिंग व्यवसायाचे गालबोट 

सुनील भंडारे पाटील 

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ श्रीक्षेत्र तुळापूर (तालुका हवेली) येथे प्लॉटिंग व्यवसायाला उत आला असून शासनाचे नियम झुगारून राजरोसपण प्लॉटिंग व्यवसाय चालू आहे,

निसर्गाच्या कुशीत भीमा ,भामा, इंद्रायणीच्या त्रिवेनी संगमावर हिंदुस्थानच्या ऐतिहासिक भूमीमध्ये असलेल्या तुळापूर हे गाव निसर्गाच्या अद्भुत डोंगर तसेच नद्यांच्या अलौकिक सौंदर्य मध्ये या गावाचे महत्व अनन्यसाधारण असताना काही स्थानिक व्यक्तींनी बाहेरील धनाढ्य व्यक्तींचा (फायनान्सर) यांचा आधार घेऊन प्लॉटिंग व्यवसाय थाटले आहेत,

वास्तविकता ग्रामीण भागात शेती क्षेत्रात प्लॉटिंग व्यवसायाला बंदी असताना तसेच तुकडा बंदी असताना कायद्याची पळवाट शोधक राजरोसपणे प्लॉटिंग व्यवसाय चालू आहेत, याला महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा पंचक्रोशीत चालू आहे,

दिवसाढवळ्या चालू असलेल्या या प्लॉटिंग व्यवसायाला उघड्या डोळ्यांनी सर्व पाहत असून, नैसर्गिक संपत्ती लहान मोठ्या टेकड्या झाडे झुडपे नष्ट होत आहेत, त्यामुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे,

महसूल खात्याने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने ऐतिहासिक तुळापूर गावांमधील अवैध चाललेल्या प्लॉटिंग व्यवसायावर तातडीने कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ व नागरिक करत आहेत,