बेमुदत अन्न त्याग सत्याग्रहाला वाढता पाठींबा..
सुनील भंडारे पाटील
वाघोली (तालुका हवेली) येथील वाघेश्वर नगर मधील सत्याग्रहाच्या पाचव्या दिवशी प्रहार दिव्यांग संघटना महाराष्ट्र प्रदेशचे धर्मेंद्र सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, बीजेपी हवेली तालुका अल्पसंख्यांक युवा मोर्चा अध्यक्ष निसारआब्बा शेख, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष हीरा भाऊ वाघमारे, बीजेपी महाराष्ट्र कामगार युनियचे अध्यक्ष विजय हरगुडे यांनी अँड बी.एम रेगे यांचे नेतृत्वा खाली चालू असलेले बेमुदत अन्न त्याग सत्याग्रहास जाहीर पाठिंबा दिला.
संतुलनच्या सात्यत्यपूर्वक लढ्यामुळे सन २०१८ मध्ये राज्य शासनाने गायरण जागा अतिक्रमण धारकांच्या नावे जमीन करण्याचा निर्णय दिला मात्र त्याची अमलबजावणी करण्यात प्रशासन चाल ढकल करत आहे याची खंत रामदास दाभाडे यांनी व्यक्त केली.
लवकरात लवकर जिल्हाधिकारीयांनी प्रश्न मार्गी लावावा अन्यथः आंदोलन तीर्व होईल त्याला वंचित बहूजन आघाडी सक्रिय सहभाग घेण्याची तयारी हिरा वाघमारे यांनी दिली. बेमुदत अन्न त्याग उपोषण लवकरात लवकर सोडवण्यास प्रयान करण्याये आश्वासन धमेंद्र सातव व विजय हरगुडे यांनी दिले.
संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थी र्मोठ्या संख्येने सत्याग्रहाला पाठिंबा दिला व प्रशासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीतर आम्ही कामगारांची मुल रस्यावर उतरू असा इशारा मुलांनी दिला.
