March 30, 2026
जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी रेखाताई बांदल 

जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी रेखाताई बांदल 

सुनील भंडारे पाटील 

पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या संचालक तसेच चेअरमन व उपचेअरमन पदासाठीची निवडणूक नुकतीच पार पडली , त्यामध्ये रेखाताई मंगलदास बांदल यांची चेअरमनपदी तसेच मनीषा शरद कालेवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली,

बँकेच्या संचालक पदासाठी संग्राम शेठ गायकवाड व प्रवीण वांजळे यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक झाली, यामध्ये दोन्ही उमेदवाराला सहा सहा मते पडल्याने निवडणूक अधिकारी यांनी पुढील प्रक्रियेसाठी चिठ्ठी टाकून उमेदवाराची निवड केली, त्यामध्ये गायकवाड यांची चिठ्ठी निघून निवड झाली, या सर्व निवडी पुणे शहराच्या जिजामाता सहकारी बँकेचे पिंगळे यांच्या अध्यक्षखाली पार पडल्या,

याप्रसंगी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल ,जाकीरभाई पठाण, दीपक पाटील फराटे, संतोष फराटे, शरद कालेवार, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक संतोष शितोळे, राहुल फराटे, माऊली फराटे, सुनील फराटे, व बँकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते,

या निवडीनंतर रेखाताई बांदल यांनी सांगितले की, महिला आत्मनिर्भर तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिजामाता सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना सहकार्य केले जाईल, आतापर्यंतच्या कालावधीत बँकेची ध्येयधोरणे समाजाला फायदेशीर ठरली असून यापुढे देखील बँकेसाठी फायदेशीर निर्णय घेतले जातील,