March 30, 2026
राहिल त्याचे घर,कसेल त्याची जमीन,मग नसेल त्याचे काय? तर सरकारी जमीन ..अँड बी.एम.रेगे

राहिल त्याचे घर.. कसेल त्याची जमीन.. मग नसेल त्याचे काय? तर सरकारी जमीन ..अँड बी. एम. रेगे

खासदार व आयुक्तांसमोर मांडली गायराणातील कुंटुंबाच्या सातबाऱ्याची मागणी

हवेली तालुका प्रतिनिधी

गेली तीस वर्षे वाघोली गायरानामध्ये अतिक्रमणकरुन राहणाऱ्या स्थलांतरीत दगडखाण कामगारांसाठी सातत्याने शासन व प्रशासन स्थरांवर पाठपुरावा करून त्यांना वास्तव्याचे पुरावे निर्माणकरण्या पासून ते शासनाकडून त्यांच्या नावे घरांसाठी जमीनीचा हक्क देण्याचे शासन धोरण करण्यापर्यत संतुलन संस्थेने जन आंदोलनात्मक संघर्ष केला.

सन २०१८ मध्ये गायराण जमीनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुंटुंबांच्या नावे निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले भुखंड त्यांच्या नावे करण्याचा शासन निर्णय ही आणला आहे. मात्र प्रशासन राज्यकर्त्यांच्या दबावाखाली येऊन या शासन निर्णयाची अमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहे.

दि.८ आक्टोंबर 2025 पासून वाघोली येथे सुरु होत असलेल्या अँड. बी.एम.रेगे सह शेकडो दगडखाण कामगारांचे बेमुदत अन्न त्याग उपोषणाच्या पार्श्वभुमीवर आज खासदार अमोल कोल्हे यांची महानगर पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचे बरोबर झालेल्या मनपाच्या बैठकीमध्ये अँड बी.एम.रेगे यांनी खासदारांना निवेदन दिले, आमदार बापूसाहेब पठारे यांनी आयुक्तांना दिलेले पत्रही या सभेत सादर केले.

खासदार अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी यांचे सोबत हा प्रश्न घेण्याचे आश्वासन दिले व आयुक्तांमार्फत या प्रश्नासोबत वाघोलीतील कष्टकरी दगडखाण कामगार वस्त्यातील स्वच्छता, ड्रेनेज, पाणी, लाईट आदी समस्यांची सोडवणूक करण्यास सांगितले.

शिष्टमंडळा सोबत मऱ्याप्पा चौगुले, शिवाजी पात्रे, प्यारेलाल जाठव अदिनाथ चांदणे आदी उपस्थित होते.