अष्टविनायक मार्गाचा कोट्यावधींचा निधी पाण्यात,थेऊर ते लोणीकंद रस्त्यावर खड्डेच खड्डे
सुनील भंडारे पाटील
महाराष्ट्र नव्हे तर अखिल हिंदू धर्माचे आराध्य दैवत विविध ची देवता मानल्या जाणाऱ्या श्री गणपती बाप्पाच्या आठ महत्त्वाच्या ठिकाणांना जोडलेल्या महामार्गावर पूरस्थिती, झाडांचे सुशोभीकरण नसल्याने तसेच पुराने रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने, कामाच्या निकृष्ट दर्जा उघडकीस आला असून यामुळे कोट्यावधीचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे,
अष्टविनायक महामार्गासाठी प्रवाशांचा प्रवास सुखाचा व कमी वेळात व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे 227 कोटी रुपये निधी या मार्गासाठी मंजूर करण्यात आला होता परंतु ठेकेदाराचा मनमानी कारभार संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाच झाले आहे.
सद्यस्थितीत पावसामुळे या मार्गावरून आडवे ओढे, नाले यांना पूर आल्याने मार्गावरून बऱ्याच ठिकाणी पाणी वाहू लागले आहे, तसेच अनेक ठिकाणी भगदाड व गटारे पडून रस्ता व साईड पट्ट्या वाहून गेले आहेत, परिणामतः त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे मुश्किल झाले आहे, बऱ्याच ठिकाणी पूर ओसरेपर्यंत प्रवाशांना थांबावे लागत आहे,
लोणीकंद ते थेऊर फाटा या मार्गावर पूर्वी १७०० झाडे होती त्या बदल्यात पुन्हा करारामध्ये ठरल्याप्रमाणे महामार्ग झाल्यानंतर ४१०० झाडांचे वृक्षारोपण करण्याचा करार झाला असताना अजून कुठेच झाडे लावलेली दिसत नाहीत, तसेच रस्ता झाल्यानंतर त्या रस्त्याची डागडूजी करणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तसेच इतर अडीअडचणी व यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने शासनाचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,
