शिरूर तालुका महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी मयूर करंजे यांची निवड
शिक्रापूर प्रतिनिधी
शिरूर तालुका महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी मयुर खंडेराव करंजे कार्याध्यक्षपदी. साचिन शिवाजीराव बेंडभर व मुख्य कार्यवाह पदी संभाजी रंगनाथ गोरडे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्याचप्रमाणे सह कार्यवाह- शेखर खंडेराव फराटे, उपाध्यक्षपदी संभाजी बाळासो चौधरी, आकाश हरिभाऊ भोरडे, संजीन जयवंतराव मांढरे,कोषाध्यक्ष राहूल रघुनाथ चातुर, सहकोषाध्यक्ष कुंडलिक शांताराम कदम, प्रमुख सल्लागार मनोहर शामराव परदेशी, शंकर बबन नन्हे, भरत शंकर दौडकर
कार्यकारिणी सदस्य- श्री. विठ्ठल बबन वळसे, बाबा युसुफ इनामदार, नानासो मारुती गावडे, स्वप्निल मारुती महाजन आदी मान्यवरांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा वीर धवल करंजे यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने यापुढे विविध स्वरूपाचे कार्यक्रम, नव साहित्यिकांची पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन, आधी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर करंजे यांनी सांगितले.
