ब्रेकिंग…! PMPML बसला गावाचे नाव बदलल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप गावाच्या नावाची पाटीची तातडीने दुरुस्ती करा ग्रामस्थांची मागणी, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्याचा इशारा,
सुनील भंडारे पाटील
PMPML परिवहन महामंडळाकडून पुणे नगर महामार्गावर कायम चर्चेत असणाऱ्या तसेच ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कोरेगाव भीमा या गावचे नाव बदलून भीमा कोरेगाव असे करत चक्क PMPML बसलाचं बोर्ड लावला आहे, त्यामुळे कोरेगाव भीमा ग्रामस्थांकडून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला जात आहे,
हे नाव बदलण्यामागे परिवहन महामंडळाचा नेमका काय हेतू आहे? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे, मुळात सर्वत्र कागदोपत्री ऐतिहासिक काळापासून या गावचे नाव कोरेगाव भीमा असेच आहे, याचा सर्वतोपरी आढावा भरारी न्यूजने घेतला असून सद्यस्थितीत शासनाकडूनच अशा स्वरूपाच्या चुका करून एखाद्या गावचे नाव बदलणे ही शुद्ध गाढव चूक असल्याची चर्चा जनतेमध्ये रंगू लागली आहे,
याबाबत कोरेगाव भीमा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला असून शासनाचे खुर्चीवर बसलेले अधिकारी अशा चुका का करत आहेत, किंवा ह्या चुका जाणून-बुजून केल्या जात आहेत का, असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे, मुळात ग्रामपंचायती पासून सर्व शासकीय दप्तरी “कोरेगाव भीमा या गावची नोंद कोरेगाव भीमा अशीच आहे” मग PMPML परिवहन महामंडळाकडून अशा स्वरूपाची चूक वारंवार का केली जाते,
तातडीने PMPML परिवहन महामंडळाकडून ही दुरुस्त व्हावी व बसला कोरेगाव भीमा अशा नावाच्या पाट्या तातडीने लावण्यात याव्या अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे,
