March 30, 2026
ध्येयपूर्ती साठी विद्यार्थ्यांनी ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे-पत्रकार रॉड्रीग्स

ध्येयपूर्ती साठी विद्यार्थ्यांनी आपल्या समोर आसलेल्या प्राथमिक ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे – पत्रकार रॉड्रीग्स : संतुलन संस्थेतर्फे पुण्यात सत्कार समारंभ 

सुनील भंडारे पाटील

ध्येयाकडे झेप घेताना प्रत्येक विद्याीर्थ्याने सर्वप्रथम आपल्या समोर असलेल्या प्राथमिक ध्येेयांना प्राधान्य दिले पाहिजे तरच आपल्या ध्येयाकडे पोहोचणे सहज सोपे होईंल असे बेळगावचे वरिष्ट पत्रकार, उजवाड कोंकणी मासिकाचे संपादक तसेच सामाजिक कार्यकर्ते लुईस रॉड्रीग्स यांनी केले.

पुणे येथील संतुलन संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. झिंदाबाद ह्या संतुलन संस्थेच्या घोषवाक्याने कार्यक्रमाचा आरंभ झाला. संतुलन संस्थेचे संस्थापक ॲड बस्तु रेगे व संस्थापिका संचालिका ॲड पल्लवी रेगे यावेळी उपस्थीत होते.

जीवनामध्ये उच्च ध्येय ठेवणे खूप महत्वाचे आहे, परंतू यावेळी आपल्यावर समाजाचे ऋण असल्याची भावना प्रत्येकाने मनात लहाणपणापासून जोपासली पाहिजे व आपली ध्येयप्राप्ती झाल्यानंतर हे ऋण कसे फेडावे याची जाणीव सुद्धा प्रत्येक विद्याीर्थाने मनात ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी बदलत्या काळाचे उदाहरण देवून सांगितले.

संतुलन संस्थेतर्फे मागील तीन दशकाहून अधिक काळापासून स्थलांतरीत दगडखाण कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या सर्वांगिण विकासासाठी, वंचित महिलांच्या सबलीकरणासाठी व दिन दुबळे व पददलितांसाठी अविरतपणे सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याची सुद्धा त्यांनी मुक्तकंठाणे प्रशंशा केली. देव बरे करुं ह्या कोंकणी शब्दांनी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्च्छा दिल्या.

यावेळी लुईस रॉड्रीग्स यांनी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा तसेच त्यांची हल्लीच कर्नाटक राज्यसरकारच्या अल्पसंख्यांक जिल्हा समीती सल्लागार म्हणून नेमणुक झाल्याबद्दल शाल, स्मृींतिचिन्ह व पुष्पगुच्च्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी संतुलन संस्थेचे संघटक आदिनाथ चांदणे, मुख्याद्यापक बालाजी ढोणे, संतुलन महिला पतसंस्थेच्या संचालिका सुरेखा गायकवाड, बेबी बोखले, सीमा साळवे व इतर मान्यवर उपस्थीत होते.