Homehaveliप्रफुल्ल शिवले यांची उज्जैन यात्रा उत्साहात 

प्रफुल्ल शिवले यांची उज्जैन यात्रा उत्साहात 

प्रफुल्ल शिवले यांची उज्जैन यात्रा उत्साहात 

सुनील भंडारे पाटील 

वढू बुद्रुक (तालुका शिरूर) ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि युवा उद्योजक प्रफुल शेठ शिवले यांची उज्जैन श्री महाकाल यात्रा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली अनेक महिला भगिनींचे तसेच परिसरातील लोकांचे श्री महाकाल दर्शनाचे स्वप्न साकार झाले,

हडपसर रेल्वे स्टेशन पासून 19 तारखेला या यात्रेची सुरुवात झाली, भाविकांना दिनक्रमित लागणारे अन्नपाणी रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये सर्व पॅसेंजर बसण्याच्या अगोदर रेल्वेच्या डब्यामध्ये ठेवण्यात आले,

19 तारखेला पावसाचा जोर वाढल्यामुळे उज्जैनला जाण्याच रूट हा मुंबई कल्याण मार्गे होता, परंतु रेल्वे गाडी त्या दिशेने असताना पुण्याच्या खडकीमध्ये रेल्वे गाडी थांबवण्यात आली, पुढे मुंबईला पाऊस जास्त असल्याने अनेक अडचणी वाढल्या होत्या, परंतु प्रफुल्ल शिवले यांची जिद्द आणि चिकाटी , धाडस कौतुकास्पद आहे,

पुन्हा गाडी ध्येय साध्य करण्यासाठी हडपसरच्या दिशेने वळवण्यात आली, त्यानंतर रेल्वे ट्रॅक उपलब्ध नसतानाही, त्यांनी सर्व अडी अडचणींवर मात करत अहिल्यानगर , भुसावळ, जळगाव मार्गे उज्जैन ला गाडी पोहोचवली, रेल्वे गाडीचा रूट बदलल्याने लोणावळा या ठिकाणी जेवण तयार करून सुमारे 3000 लोकांचे जेवणाची पॅकेट लोणावळा रेल्वे स्टेशनला आणण्यात आले होते, परंतु हे जेवण पूर्णपणे वाया गेले, त्यामुळे नवीन रूटला जेवण ऍडजस्टमेंट करण्यासाठी आयोजकांची व स्वयंसेवकांची दम छाक झाली,

उज्जैन श्री महाकाल, श्रीकाळभैरवनाथ, महर्षी सांधिपाणी आश्रम, राजा विक्रमादित्य व इतर मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची पुण्य मिळाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले,

दुपारी व रात्री महाप्रसाद चा लाभ लोकांनी घेतला 21 तारखेला रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित महिलांनी मोठा आनंद साजरा केला, सर्व कार्यक्रम उरल्यानंतर रात्री एक वाजता रेल्वे पुण्याच्या दिशेने रवाना झाली,

उज्जैन श्री महाकाल यात्रेमधील महत्त्वाची बाब म्हणजे एकूण तीन हजार भाविक भक्तांपैकी 80 टक्के या महिला होत्या , प्रफुल्ल शिवले मित्रपरिवारातील 100 च्या वर स्वयंसेवकांनी जबाबदारीने अन्नपाणी लोकांपर्यंत पोहोचवले,

Bharari News
Bharari News
मुख्य संपादक : सुनिल भंडारे पाटील
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!