मल्हारगडवर अभ्यास, स्वच्छता मोहीम आणि आनंदोत्सव!
मल्हारगड, पुणे | श्री दुर्ग संवर्धन संस्था, महाराष्ट्र
सुनील भंडारे पाटील
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश होऊन एकूण १२ गड दुर्गांनी जागतिक गौरव प्राप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर, श्री दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने मल्हारगडावर अभ्यास, स्वच्छता मोहीम आणि आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
स्वच्छता व संवर्धन – इतिहासाची जपणूक
या उपक्रमाअंतर्गत गडावरील बुरुज, महादेव मंदिर परिसर, तसेच पायवाटा याठिकाणी झाडेझुडपे हटवून स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक व इतर अनैसर्गिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यात आला.
दुर्ग अभ्यासक व स्वयंसेवकांनी गडाचा ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक अभ्यासही केला. या कार्यात विविध वयोगटातील उत्साही दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला.
उत्सव… गडमाथ्यावर अभिमानाने!
या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा करत ‘माझा गड, माझा अभिमान’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला. फडपथक, गडगडाट घोषणाबाजी व हर हर महादेवच्या जयघोषात आनंदोत्सव साजरा झाला.
अधिक माहिती व पुढील मोहिमेसाठी संपर्क करा:
विठ्ठल टाले – 9823220527
साहिल – 9356744991
