March 30, 2026

हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

       भारतीय जैन संघटना वाघोली विद्यालयात 23 जून 2022 वार गुरुवार रोजी बी.आय.
एस. ( BIS ) क्लबची स्थापना करण्यात आली.’भारत की आजादी के अमृत महोत्सव’
(75 वर्षा) निमित्त,केंद्र सरकारच्या ‘Ministry of Consumer Affairs Food
and Public Distribution’ ( अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण) खात्या
अंतर्गत  भारतातील प्रत्येक राज्यात हा उपक्रम माध्यमिक शाळा, विद्यालय
तसेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राबविला जाणार आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’
उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या पंतप्रधानांनी 12 मार्च 2021  रोजी
अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून केली तर त्याची सांगता 15 ऑगस्ट 2023
रोजी केली जाईल.BIS( Bureau of Indian Standards-   भारतीय मानांक संस्था) 
क्लब  9 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षे साठी राबविण्यात येणार आहे.
सदर क्लब अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतील.
तसेच प्रत्येक उपक्रमासाठी BIS कडून  प्रत्येकी दहा हजार रुपयांचे मानधन
देण्यात येणार आहे. क्लबच्या मार्गदर्शकांचे (mentor) दोन दिवसीय निवासी
ट्रेनिंग 6 व 7 मे रोजी ‘यशदा’ बाणेर येथे संपन्न झाले,        

 BIS हे भारतातील सर्व  उत्पादकांच्या  उत्पादनांना ISI मार्क
सर्टिफिकेशन देते. तसेच भारतीय उत्पादनांचे मानांकन ठरवते. त्याचप्रमाणे 
इंडस्ट्रियल लायसन्स अँप्रोव्हड करते.BIS क्लब
स्थापनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना,विद्यालयीन वयातच स्टैंडर्डस किंवा
मानांकनाचे महत्व कळावे तसेच मेक इन इंडिया अंतर्गत  सर्व प्रकारच्या
कच्चा व पक्या  मालाचे उत्पादन भारतातच व्हावे हा आहे.याचप्रमाणे 
बाजारातील ISO किंवा आयएसआय(ISI )मार्क हॉलमार्किंग उत्पादने खरेदी
करतो,त्यामध्ये ग्राहक म्हणून भारतीय  नागरिकांची फसवणूक होऊ नये, हा आहे.
 

सदर
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बी.आय.एस. (BIS)ॲप कसे वापरायचे तसेच मानांकन
कसे बनवायचे खरेदी केलेल्या वस्तू ISI मार्किंग,हॉलमार्किंग च्या आहेत की
नाही, हे  ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.. *पुणे* *जिल्ह्यातील* *BIS* 
*क्लब* *स्थापन* *करणारी* *भारतीय* *जैन* *संघटना* *वाघोली* ही **सर्वात* *
*प्रथम* *विद्यालय* *आहे* … 
सदर कार्यक्रमासाठी
विद्यालयातील नववी ते बारावीचे विद्यार्थी,विद्यालयाचे प्राचार्य श्री.
भंडारी सर, उपप्राचार्य श्री. गेठे सर तसेच उच्च माध्यमिक विभागातील सौ.
सिंह मॅडम ,चासकर मॅडम,नाईक मॅडम, अहंकारी मॅडम,
गव्हाणे सर,ढेपे मॅडम, क्षीरसागर सर तर माध्यमिक विभागामधून श्री.स्वामीसर
,लोणकर सर, शिंदे सर, शितोळे मॅडम, शिंदे मॅडम उपस्थित होत्या..