March 30, 2026

लोणी काळभोर अनिकेत मुळीक  

             आपण सर्वांनी धर्मवीर चित्रपट पाहिलाच असेल त्यात त्यांची दिघे साहेबांनी नाथांचा नाथ हो लोकांचा एकनाथ हो अशा *कौतुकास्पद* शब्दात वर्णन केले आहे.जाणून घेऊया एकनाथ शिंदे न बाबत.. *रिक्षावाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री*      

राजकारणात येण्यापूर्वी एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे. पण वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यांनी राजकारणात कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला आणि 30-35 वर्षांनंतर आता ते मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले आहेत. तसंच एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.ठाण्यातील शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांना राजकारणाची दिशा मिळाली. 1997 मध्ये आनंद दिघेंनी शिंदेंना ठाणे महापालिकेचं तिकीट दिलं. एकनाथ शिंदे हे गेली अनेक दशके ते शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत. 

आपल्या पहिल्याच प्रयत्नांत शिंदेंनी महापालिकेत बाजी मारली आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. इथे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले.2004 सालापासून सलग चार वेळा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेत.शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. तसंच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी सोपवली होती.२०२२ मधे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,