March 30, 2026

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले

         आषाढी एकादशी निमीत पंढरपुरात दाखल झालेल्या पालखी सोहळ्यातील बऱ्याच
दिंड्या पावसाची रिपरीप सततधांर चालु असल्याने एकादशी दिवशीच परतल्या तर
काही बारस सोडून निघाल्या तरी दुसरे दिवशीही
चंद्रभागा काठी भावीकांची
स्नानासाठी अलोट गर्दी दिसत होती .        

एकादशीआधीही लाखो वारकरी कोरोना भयाने
येवून गेले होते व काही  नंतरही पंढरीत आलेचे चित्र दिसत होते .पंढरपुर
क्षेत्री आषाढी एकादशी नंतर बारशीचे दिवशीही मोठ्या संख्येने चंद्रभागा
तिरारावर पुलाचे दोन्ही बाजुंनी  स्नानासाठी भावीक वारकरी उतरलेले आहेत,          

तसेच गेल्या पंधरा दिवसापासून वारीमध्ये सामील झालेले असंख्य वारकरी
विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले होते, त्या भाविकांची रांग दर्शनासाठी
कालपासून लागली आहे, तसेच देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या
संख्येने वारकऱ्यांची भाविकांची पंढरपूरमध्ये येजा होत आहे,