त्या पालेभाज्या आजुबाजुच्या गावात बाजारासाठी व दैनंदिन वापरासाठी जातात.असा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनसाठी बहुउपयोगी असणारा आठवडे बाजाराची पावसाने दैनी अवस्था झाली असुन सगळीकडे गलीच्छ वातावरणामुळे व घाणेरड्या राड्यारोड्या रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बाजारातील भाज्या सर्व सामान्य कुटुंबाच्या घरी जात असल्याने आपण घरी,भाज्या नेतोय की रोग घेऊन जोतोय अशी ग्रामस्थांना शंका येत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच वातावरण गढुळ असताना व विविध आजारांच्या साथी पसरलेल्या असताना प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन व ग्रामपंचायत उरुळी कांचन झोपेचं सोंग घेत आहेत का.? की जाणुन बुजून तिकडे दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात सगळीकडे चिखल झाला असुन शेती माल ठेवायचा कुठे असा प्रश्न पडला आहे. आठवडे बाजारात सोईसुविधांचा अभाव असुन पावती मात्र दुप्पट केली आहे.
तसेच पावती मग दिली जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व बाजारात बसणाऱ्यांनी केली असुन नुसते पैसे घेतले जातात पण सोईकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही.



