जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे
पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व मज्जिद अध्यक्ष व मौलवी तसेच मुस्लिम तरुणांची ईद ए मिलाद हा सण दि.16/09/2024 रोजी असल्याने गणेश उत्सव कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे साठी ईद मिरवणुक दि.18/09/2024 रोजी 15/00 वा ते 18/00 वा. चे दरम्यान घेण्याचे पोलीस प्रशासन व पत्रकारांसमोर जाहीर केल्याबददल उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रवींद्र चौधर यांनी सर्व मुस्लीम बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,
तसेच सामाजिक एकात्मता राखणे कामी यापुढेही सर्व धर्मीयांनी प्रशासनास सहकार्य करणेबाबत तसेच सामाजिक सलोखा राखणे साठी मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.सदर बाबत उस्मान दादू इनामदार , मुस्ताक मोमीन , युसुफ पटेल , ऐजाज आत्तार ,दादा मिया पटेल , आरिफ पटेल इ मुस्लिम समाजाचे मान्यवरांनी जाहीर आवाहन करून ईद-ए-मिलाद ची मिरवणूक दि.18/09/2024 रोजी घेण्याचे एकमताने ठरवले .
