March 30, 2026
शिनोलि  रवींद्र बोऱ्हाडे .
      घोडेगाव मंचर ता-श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव).येथे माजी गृहमंत्री महा.मा. दिलीपराव वळसे पाटील यांच्या शुभहस्ते  वडगाव काशिंबेग येथील विविध विकास कामांचे भूमपूजन व उद्दघाटन समारंभ संपन्न होणार आहे.    

आंबेगाव तालुक्याचे लाडके नेतृत्व आंबेगाव तालुक्यातील भूषण म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य माजी गृहमंत्री  यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकासकामांसाठी निधी देण्यात आला असून त्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्धाटन समारंभ दि.२३/७/२०२२ रोजी सायं.४ वाजता श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग ता.आंबेगाव या ठिकाणी होणार असून 

सदर कार्यक्रमासाठी मा.दिलीपराव वळसे पाटील यांनी  श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग ते साकोरे या गावांना जोडणारा  घोडनदी पुल बांधकाम यासाठी रू.७ कोटी २१ लक्ष .

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग ते सुलतानपूर रस्त्ता. रु १ कोटी ५०  लक्ष. तर,श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील जिल्हा परिषद शाळा नवीन इमारत बांधकामासाठी  ४२ लक्ष रुपये श्री स्वयंभू मोरया गणपती मंदिर  परिसरात पेव्हीग ब्लॉक यासाठी रू १० लक्ष .याप्रमाणे निधीची तरतूद करून देण्यात आली आहे 
      या कार्यक्रमाचे उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे माननीय खासदार अमोलजी कोल्हे  श्री कुलस्वामी क्रेडि्ट सो.अध्यक्ष . मा.शंकरशेठ पिंगळे ,देवेंद्रशेठ शहा,विवेकदादा वळसे ,देवदत्त निकम साहेब,लीना देशपांडे मॅडम,विष्णू काका हिंगे,नंदकुमार सोनवले,निलेश थोरात,आयुष प्रसाद साहेब, जालिंदर पठारे अंकितशेठ जाधव, उषाताई कानडे ,असे अनेक प्रमुख मान्यवर ज्यांनी माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या सोबत राहून तालुक्याच्या विकासकामांसाठी नेहमीच योगदान दिले आहे.असे अनेक मान्यवर सर्वांच्या शुभहस्ते कार्यक्रम पार पडणार आहे
ह्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.