गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात
यंदा भारताच्या ७५ व्या अमृतमहोत्सवाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशात उत्साह पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनाआधीच संपूर्ण देश तीन रंगांनी न्हाऊन निघाला आहे.
शिरूर पोलिस स्टेशन ने,आज दिनांक १५ रोजी १०:१५ ते १०:४५ वा.चे दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक यादव संदीप यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहरात शिरूर पो.स्टे.चे पोलिस अधिकारी , पोलिस अंमलदार यांची मोटर सायकल रॅली पार पडली.
रॅली दरम्यान “भारत माता की जय, वंदे मातरम्, हिंदुस्थान जिंदाबाद,” या प्रकारच्या घोषणा देवून शिरूर शहरात तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली व एकतेचा संदेश दिला.
*रॅली मार्ग:-शिरूर पो.स्टे.-पाबळ फाटा – मुंबई बाजार -डंबे नाला – पाच कंदील चौक – बीजे कॉर्नर – निर्माण प्लाझा – हुडको कॉलनी – रयत शाळा मैदान – निर्माण प्लाझा – बीजे कॉर्नर – तहसील कार्यालय – पोलिस स्टेशन* जनसमुदाय:- ३० ते ३५ पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला


