लोणी काळभोर अनिकेत मुळीक
लोणी काळभोर(तालुका हवेली)
पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल तसेच कॉलेज समाजभूषण गणपतराव काळभोर आर्ट्स कॉमर्स सायन्स व लोणी काळभोर ग्रामपंचायत 13 ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत सर्वांनी आपल्या घरावरील तिरंगे ‘हर घर तिरंगा’ या केंद्र सरकारच्या अभियानाला प्रतिसाद देत ध्वजारोहण झाले,
*गांधीस्तंभ* हा स्वातंत्र्य काळापासून असल्याने *लोणी काळभोर गावाला* एक वेगळीच ओळख निर्माण करून देतो प्रथम सार्वजनिक ध्वजारोहणाचा मान गांधिस्तंभ (गांधीगोल)ला मिळतो. महात्मा गांधी तरुण मित्रमंडळातर्फे सजावट करण्यात आली होती. गावातील पोलीस पाटील मार्फत ध्वजारोहण करण्यात येते. यावेळी सरपंच व सदस्य,कर्मचारी,नेतेमंडळी तसेच पोलीस पथक, होमगार्ड पथक, सर्व शाळा, ग्रामस्थ मानवंदना देत तिरंगा ध्वज फडकविला जातो. व एकात्मतेचे वातावरण निर्माण होते.अशा प्रकारे उत्साहात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
कोरोना प्रादुर्भावात कमी झाल्याने दोन वर्षांनी सामुदायिक ध्वजारोहण करण्याची संधी लाभल्याने सर्वत्र अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात सजावट करण्यात आली होती.झेंडावंदन गावातील प्रत्येक घराघरात वाड्या वस्त्यांवर व ठिकठिकाणी ध्वज स्तंभ उभारण्यात आलेल्या प्रत्येक ध्वज स्तंभाचे तिरंगा ध्वज मोठ्या दिमाखात व तिरंगी फुगे यांची सजावट व ध्वजारोहण होत असताना ध्वजावर होणारी पुष्पवृष्टी अशा जल्लोषात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सण साजरा करण्यात आला.लोणी काळभोर पोलीस वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांचे सहकारी पोलीस यांनी बाईक रॅली काढून पोलिसांचे कर्तव्य व एकनिष्ठता दाखवत,भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत एकच जल्लोष केला.
त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी दुकानांवर तिरंगा फडकवला. तर, रिक्षाचालक आणि दुचाकीचालकांसह मोटारमालकांनी आपल्या वाहनावर तिरंगा फडकवला आहे. विविध राजकीय पक्षांसह सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि संघटनांनी काढलेल्या दुचाकी तिरंगा फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

