March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
             जिवणामध्ये शिक्षणा इतकेच मुलांवर संस्कारही महत्वाचे असून त्याची सुरुवात या छोट्याशा हरीपाठापासून करुया , असे विचार हभप पोपट महाराज् मिङगुले यांनी             मिडगुलवाडी येथे  स्थानीक उद्योजक अमित मिडगुले यांचे ज्ञानयोग सुगंधालयतर्फे हरीपाठ व खाऊवाटप प्रसंगी जि . प .प्रशालेत केले .        

यावेळी माजी सरपंच हरीभाऊ मिडगुले , सरपंच कैलासनाना मिडगुले, अमोल मिडगुले, आनंदीबाई गाजरे, संध्या मिडगुले, मुख्याध्यापक संपतराव कांदळकर, सागर गायकवाड गुरुजी उपस्थित होते . यावेळी पोपट महाराज यांनी मुलांचा दर शनिवारी हरीपाठ घेऊ व खाऊही मुलांना देणेचे सुतोवाच केले . मुले व युवा नवपिढीचा असा समज आहे की भजन अभंग देवदेव हे मोठेपणी वा म्हातारपणी करायचे असतात, तेंव्हा त्यांनी १४ व्या वर्षी शंभुराजानी बुद्धभूषणादी ग्रंथ लिहीले, माऊलींनी १७व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली व त्यासाठी धर्ममार्तंडांनी पिडून नैराश्याने कुटीत कोंडून घेतलेल्या ज्ञानेश्वरांना ९ वर्षाचे मुक्ताईने ‘ ताटी उघडा ज्ञानेश्वरा ‘ आदी ४२ ताटीचे अभंग गाऊन प्रेरीत केले होते . तेव्हा बालपणातच संताचे सोपे हरीपाठातील अभंग मुलांचे डोक्यात बसून पिढी संस्कारीत बनू शकतात असे पोपट महाराजांनी सांगितले . ज्ञानयोग अगरबतीचे वतीने इतरत्र एकूण ५००० हरीपाठाचे वाटप वारकरी व इतर ठीकाणी होणारआहे .गायकवाड सर यांनी आभार मानले .