March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
        प्रत्येक घराघरांवर तिरंगा ध्वज फडकावीत कान्हूर मेसाई , घोलपवाडी , मिडगुलवाडी येथे स्वातंत्र दिन वृक्षरोपणादी हितकारी   उपक्रम राबवून साजरा करणेत आला . विद्याधाम हायस्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा. गंगाधर पुंडे व मेजर लहू तळोले यांचे हस्ते ध्वजारोहन होवून, दांडिया त्रा , भगतसिंग , शिरीषकुमार , सावित्रीबाई फुले यांचेवर मुलांनी उत्कृष्ट नाट्य सादर केले .प्राचार्य अनिल शिंदे यांचे संकल्पनेतून नंतर भव्य मॅरेथॉन स्पर्धा देवून ग्रामीन भागातील मुलांना उतेजनार्थ बक्षीसे देणेत आली .

ग्रामपंचायत समोर सरपंच चंद्रभागा खर्डे , उपसरपंच सोपान पुंडे, मेजर संतोष ननवरे आदींचे हस्ते ध्वजारोहन करून वृक्ष लागवड व तिरंगा ध्वज वाटप आधीच करणेत आले . माजी सैनीकांचे नावाचे फलक बनवुन त्यांनां बहुमान देणेत आला .

जि . प . शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ननवरे , सरपंच चंद्रभागा खर्डे , उपसरपच सोपान पुंडे व बंडू खर्डे आदी सर्व माजी सैनिकांचे हस्ते ध्वजारोहन करणेत आले . मुलांचे देशभक्ती गिते
लहान मुलांचे हाती झेंडे घेवून केलेले नृत्य
व भाषणांनंतर खाऊ व लाडू वाटप करणेत आले .
         मिडगुलवाडी येथे सरपंच वर्षा धनंजय मिडगुले यांचे हस्ते ध्वजारोहन करून प्रत्येक घरोघरचे एकानेतरी वृक्ष लागवड केली . तिरंग्याचे डीझाईनच्या ९० वर साड्या परीधान केलेल्या महिलांमध्ये उत्साह दिसत होता . हभप पोपट महाराजांचे प्रेरणेने गायरानामध्ये शंभरावर झाडे लावणेत आली .
फोटो : जि.प शाळा कान्हूर मेसाई येथे ध्वजारोहन करताना सरपंच उपसरपच माजी सैनीक
यावेळच्या स्वातंत्र्य दिनाचे विशेष म्हणजे मिडगुलवाडी येथील ९० महिलांनी हभप पोपट महाराजांचे संकल्पनेतून तिरंग्याचे रंगाच्या साड्या परीधानून हाती तिरंगा  झेंडा घेवून विद्यार्थ्या प्रमाणे भारत माताकी जय घोषणा देत प्रभात फेरी काढली . भारताच्या इतिहासात आदर्शग्राम मिडगुलवाडीचा हा आदर्श उपक्रम ठरेल .