माजी अध्यक्ष जयवंत गावडे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील सभेमध्ये ही नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून भोर यांची बिनविरोध निवड पार पडली.तसेच उपाध्यक्ष पदाची जागा रिक्त झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी संदिप चव्हाण यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र उर्फ बाबुराव भोर व उपाध्यक्ष संदिप चव्हाण यांचा सत्कार माजी सरपंच कुशाभाऊ गावडे,माजी उपसरपंच संजय भोरडे पाटील,सरपंच दिपक गावडे,माजी उपसरपंच अशोक इंगळे,माजी उपसरपंच सूरज भोरडे पाटील,माजी उपसरपंच बाळासाहेब केसवड,माजी अध्यक्ष जयवंत गावडे,मुख्याध्यापक संदिप गोसावी यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी माजी अध्यक्ष तथा शिक्षण प्रेमी राहुल शिंदे,राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजयराव लोखंडे,माजी अध्यक्ष संजय पायगुडे,शिक्षणतज्ञ हर्षवर्धन चव्हाण,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सोपान ढवळे,हुसेन मुलाणी,मारुती ठवरे,युवराज इंगळे,सनी शिंदे,रेखा धुमाळ,भोरडे ताई,जय शिंदे,महेंद्र लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.



