March 30, 2026

* रखमाबाई थोरात यांचे निधन *

शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
           पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष साहेबराव थोरात यांच्या पत्नी सामाजीक कार्यकर्त्या रखमाबाई साहेबराव थोरात (वय ७४ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक व धार्मिक कार्यात त्या सक्रिय सहभागी होत्या. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्या परिसरात सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाऊसाहेब थोरात सर व कासारी येथील गायकवाड विद्यालयातील रावसाहेब थोरात सर यांच्या त्या मातोश्री होत.