शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संतोष उत्तरेश्वर जगताप यांच्या राहत्या घराचा दरवाजा जोराचा धक्का देऊन उघडुन तीन अनोळखी चोरटे घरात घुसले आणि फिर्यादी जगताप व त्यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवत पत्नीच्या अंगावरील सोने काढुन देण्याची धमकी दिली. त्यावेळी त्यापैकी एक अनोळखी ईसम हिंदी मध्ये बोलला की,” पैसा, सोना, अंगठी कीधर कीधर रखा ओ बताओ “ त्यावेळी फिर्यादी जगताप यांच्या पत्नीने भीतीपोटी घाबरून हाताने लोखडी कपाट दाखवुन त्यांना कपाटातील सोने कोठे ठेवले आहे ते सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील सर्व कपडे बाहेर काढुन अस्ताव्यस्त फेकुन देत कपाटातील पत्नीचा सोन्याचा गंठन, दोन्ही कानातील कर्नफुले, लहान मुलीचे सोन्याचे दागीने व कपाटातील ५० हजार रोख रक्कम तसेच फिर्यादी व त्यांच्या पत्नीचे मोबाईल काढुन घेतले. त्यानंतर घरातुन बाहेर जाउन घराला बाहेरून कडी लावली. फिर्यादीने चोरट्यांच्या हातातील बॅटरीचे उजेडामध्ये चोरट्यांना पाहीले तीघेही चोरटे साधारण साडेपाच ते पावणे सहा फुट उंचीचे, अंगाने मध्यम बांध्याचे, तोंडाला काळे रंगाचे मास्क बांधलेले, अंगामध्ये काळे रंगाचे जर्कींग व पॅन्ट घातलेले कपडे अशा वर्णनाच्या असल्याचे फिर्यादी जगताप यांनी पोलिसांना सांगितले आहे. घराची बाहेरून कडी लावून चोरट्यानी फिर्यादी जगताप यांच्या शेजारीच दुसऱ्या खोलीती त्यांचे मेव्हुने राहत असलेल्या खोलीचा दरवाजा तोडल्याचा जोराचा आवाज आला.
त्यानंतर थोडयावेळाने फिर्यादीच्या आईचाही ओरडण्याचा आवाज आल्याने जगताप हे घराचा दरवाजा खिडकीतुन गज घालुन उघडुन बाहेर आले. त्यावेळी त्यांचे मेव्हणे गणेश व आई या दोघाच्या खोलीचा दरवाजा बाहेरुन लावलेला होता. नंतर त्यांनी दोघांचे खोलीचा दरवाजा उघडला त्यावेऴी त्यांचे मेव्हणे गणेश महादेव घरत यांनी सांगितले नुसार त्यांचे खोलीचा दरवाजा तोडुन त्यांना कोयत्याचा धाक दाखवुन घरातील कपाट उचकटुन कपाटातील सोन्याची अंगठी ,पत्नीचे सोन्याचे कर्न फुलांचा जोड ,सोन्याचे वेल व रोख १० हजार रुपात तीन अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याचे सांगितले. या घरफोडीत फिर्यादी संतोष उत्तरेश्वर जगताप यांच्या घरातील रोख ५० हजार, १ लाख रुपयांचे सोन्याचे आडीच तोळ्याचे गंठण, ३२ हजारांची सोन्याच्या कर्नफुलांचा जोड, १० हजारांचे सोन्याचे लहाण मुलांचे दागीने तसेच फिर्यादीचे मेव्हने गणेष महादेव घरत याचे खोलीतुन ३६ हजार रुपयांचा सोन्याचा ९ ग्रॅम वजनाचा कर्नफुलांचा जोड, २४ हजारांचे सोन्याचे ६ ग्रॅम वजनाचे कानातील वेल, २० हजार रुपयांची सोन्याची ५ ग्रॅम वजनाची हातातील अंगठी, १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ८२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतकरे पुढील तपास करत आहेत.


